प्रसिद्ध कॅमेरामन जॉनी लाल यांचे कोरोनाने निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडचे प्रसिद्ध कॅमेरामन जॉनी लाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून तो कोरोनाने पीडित होते. मात्र आज त्यांचा प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जॉली लाल यांनी ‘रहना है तेरे दिल में’ आणि ‘मुझे कुछ कहना है’ यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटासाठी काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अभिनेता आर. माधवन, तुषार कपूर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला.

‘विघ्न सुरुच असून ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाचे डीओपी (कॅमेरामन) जॉनी लाल काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तुम्ही एक अद्भूत व्यक्ती होतात. RIP सर. तुमचा विनम्र स्वभाव, दयाळूपणा आणि प्रतिभा नेहमीच आठवणीत राहील’, असे ट्वीट आर. माधवन याने केले आहे.

‘RIP जॉनी सर! ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाला तुम्ही अशा पद्धतीने शूट केले की तो आजही एकदम फ्रेश वाटतो. माझ्या पहिल्या चित्रपटाला एक सुंदर, तरुण, नैसर्गिक लूक देण्यासाठी खूप खूप धन्यवाद’, असे ट्वीट तुषार कपूर याने केले आहे.

एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जॉनी लाल यांना कोरोनाची लागण झाली होती. ते घरीच विलगिकरणामध्ये राहून उपचार घेत होते. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here