श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त महाराज यांचे आशीर्वाद घेऊन केला.
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादर) – गोकुळ निवडणुकीसाठी आता प्रचाराला सुरुवात होत असून, आज (दि.२२) ‘राजर्षी शाहू शेतकरी आघाडी’च्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. प्रचाराच्या शुभारंभ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त महाराज यांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला.

यावेळी, ना. राजेंद्र पाटील यड्रावकर, खा. संजय मंडलिक, माजी खा. निवेदिता माने वाहिनी, आ. राजेश पाटील, माजी आ. चंद्रदीप नरके, माजी आ. उल्हास पाटील, दत्त साखरचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील, गोकुळ माजी संचालक दिलीप पाटील, कुरुंदवाड नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सर्जेराव शिंदे, वैभव उगळे, प्रकाश पाटील-टाकवडेकर, विलास गाताडे, भीमगोंडा बोरगावे, शिरोळ पंचायत समिती सभापती कविता चौगुले, जिल्हा बँक संचालक बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, भवानीसिंह घोरपडे, विद्याधर कुलकर्णी, भोला कागले तसेच राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.






