बेलावडे येथे कोविड लसीकरण संपन्न

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – जिल्हा परिषद शाळा बेलावडे येथे अतिशय नियोजनबद्द कोविड१९ लसीकरनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जावली तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सायगाव पी एच सी चे डॉ. अजय वाढते (एम ओ) व डॉ .प्रियांका पाटील (सी एच ओ ) यांचे टीमने उत्कृष्ट लसीकरण मोहीम राबवली .

आरोग्य टीमचे सहकारी धुमाळ (एच ए), पी व्ही कुलकर्णी (एम पी डब्ल्यू ), एस एम सोयाम (ए एन एम ) तसेच आशा सेविका रेश्मा शिंदे , रेश्मा दीक्षित , कांभीरे अंगणवाडी सुपरवायझर , ऑपरेटर पाटील , अंगणवाडी सेविका विमल घाडगे , मदतनीस हेमा शिंदे यांनी अतिशय सुरेख नियोजन करून १४९ नोंदणीकृत लोकांना कोविड १९ ची लस कुठलाही साईड इफेक्ट न होण्याची काळजी घेऊन दिली.

तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दळवी मॅडम व शिक्षिका पालकर मॅडम व ऑपरेटर चैताली शिंदे ताई , श्रीधर आहिरे यांनीही ऑनलाइन नोंदणीसाठी सहकार्य केले .बेलावडे गावच्या सरपंच सौ. वनिता रोकडे , उपसरपंच अजय शिंदे , ग्रामसेवक शेवाळे , पोलीस पाटील निशांत रोकडे , शिपाई अनिल शिंदे यांचे उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला .

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे , नितीन शिंदे , सुभाष पवार , बळवंत शिंदे , बापूराव गायकवाड गुरुजी, निलेश रोकडे, राहुल रोकडे , जयराज शिंदे इत्यादी आरोग्य व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत बेलावडे व बौद्धजन मंडळीं यांनी लसीकरणाच्या साठी आलेल्या लोकांचे निटनिटके नियोजन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here