‘छोड़ेंगे न तेरा साथ… मरते दम तक’ : व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाचा तंबाखू मळतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली – कोणतेही व्यसन माणसाला अखेरच्या क्षणापर्यंत सोडत नाही हे स्पष्ट करणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, दुसरी गरजेची गोष्ट. ‘छोड़ेंगे न तेरा साथ… मरते दम तक’…दारु अजूनही लिस्टमध्ये टॉपवर आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये छोड़ेंगे न साथ तेरा साथी मरते दम तक हे गाणं सुरू आहे.
कोरोनानं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांना रांगेत उभा राहून वाट पाहावी लागत आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक प्रयत्न करत आहेत. अशाता आता सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे, मात्र हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण आहे त्याला लागलेलं तंबाखूचं व्यसन.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये तर काहींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर असलेला एक व्हेंटिलेटरवरील रुग्ण दिसत आहे. त्याच्या तोंडामध्ये ऑक्सिजन पाईप आहे. मात्र, तो आपले हात अशा पद्धतीनं एकमेकांवर घासत आहे, जसं तंबाखू किंवा गुटखा मळतात.

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की या व्यक्तीजवळ एक महिला बसलेली आहे. तर, नर्सही जवळच आहे. मात्र, तो स्वतःच्याच नादात व्यग्र आहे. ही संपूर्ण घटना एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी कधीही म सुटणारी सवय, अशा कमेंट या व्हिडिओवर केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विटदेखील केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here