शाकाहारी व धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी

नवी दिल्ली – धूम्रपान करणारे आणि शाकाहारी लोकांना कोरोनाचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो, असा निष्कर्ष केंद्र सरकारच्या ‘कॉन्सिल ऑफ सायंटीफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) ने काढला आहे. या आधी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि चीन येथे करण्यात आलेल्या दोन इतर सर्वेक्षणांमध्येसुद्धा धूम्रपानाबाबत असेच निष्कर्ष निघाले होते.

या अभ्यासामध्ये 140 डॉक्टर आणि संशोधकांचे एक टीम सहभागी झाली होती. त्यांनी कोरोना विषाणुविरोधी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज, कोरोना विषाणू आणि कोणत्या व्यक्तीमध्ये त्यांचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता असते याचा अभ्यास केला.

या अभ्यासामध्ये ‘सीएसआयआर’च्या 40 प्रयोगशाळांमधील लोक व त्यांच्या नातेवाईकांमधील 10 हजार 427 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर ज्यांचा रक्तगट ‘ओ’ आहे त्यांना कोरोनाचा धोका कमी असतो तर ‘बी’ किंवा ‘ए-बी’ रक्तगट असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here