महाराष्ट्र शासन 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याआधी नियोजन करूनच लसीकरण करावे – पी एम पाटील

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र शासनाने 1 मे पासून 18 वर्षा वरील सर्वांना लसीकरण देण्याचा निर्णय घेतला असून नियोजन करूनच लसीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे उपप्रमुख पी एम पाटील सर यांनी केली आहे.

या मागणीपत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन सर्वांना मोफत लस देत आहे अतिशय चांगला निर्णय असून लस ही सर्वांनी घ्यायलाच पाहिजे त्याशिवाय कोरोनाचा खात्मा होणे कठीण आहे परंतु त्या साठी नियोजन सर्वात महत्त्वाचे असून प्रत्येक शहराची लोकसंख्या लक्षात घेता व या आधी पाच वर्ष पूर्वी झालेल्या निवडणुका आधी जे 8 वीत विद्यार्थी शिकत होते ते आता 18 वर्षाच्या यादीत समाविष्ट होतील त्यामुळे लोकसंख्येत लक्षणीय वाढ होईल दररोज लोकसंख्येच्या मानाने डोस किती येतील त्यावरून फक्त तेवढ्याच लोकांना डोस देता येईल आपण निवडणूकीचा पूर्वीच्या झालेल्या याचा विचार करा एका शहरात आपण किती बुध लावतो तेही सुद्धा सकाळी 7 ते रात्री पर्यंत उशिराने नागरिक मतदान करतात तेही 60 ते 65%मतदान होते आता तर मोफत लस दिली जाणार आहे तेही एकाच ठिकाणी किंवा दोन-तीन ठिकाणी लस घ्यायला नागरिक ग्रामस्थ येतील जास्त आणि लसीच डोस कमी त्यामुळे शासनाच्या विरोधात नागरिक /ग्रामस्थ मध्ये असंतोष निर्माण होईल एखादा ज्येष्ठ नागरिक पुरुष-महिला लस घेण्यासाठी येईल त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असेल त्याच्या नंबर लागल्या आधीच लस संपून जाईल आणि तो किंवा ती ज्येष्ठ नागरिक तासन तास लाईनीत उभा राहून जर त्याला लस घेता आली नाही तर त्याचे किती हाल होतील.

पोलीस शासनाने पोलीस यंत्रणेची मदत घेतली तर लसीकरण सुद्धा व्यवस्थित केले जाईल आणि सोशल डिस्टंसिंगचा विचार करता येईल आणि कोरोनाचा सुद्धा फेलाव होणार नाही. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना प्राधान्य देऊन त्यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे तसेच ज्यांना दुसरा डोस दिला जाणार त्यांना वेगळ्या लायनीत उभे करावे जेवढे डोस उपलब्ध होतील तेवढाच लोकांना कुपन जेवून बोलवावे आणि शक्य होईल तर दोन किंवा तीन केंद्र मोठ्या शहरात असल्यास जास्तीत जास्त नागरिकांना लस दिली जाईल महाराष्ट्र शासनाचा मोफत उपक्रम हा अतिशय चांगला असून अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त लोकांना नियमांचे पालन करून लस दयावी सर्व नियोजन करून 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस दयावी, अशी मागणी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे उपप्रमुख पी एम पाटील सर धरणगाव जि जळगाव 7588580735 यांनी केले आहे.

या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन, पालकमंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक , तालुका तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, सर्व प्रसिध्दीमाध्यमांना पाठविल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here