राहुल गांधींवर आक्षेपार्ह जाहिरातीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसे स्टाईल राडा

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या कंपनीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खळ्ळ-खट्याक स्टाईलने धडा शिकवला आहे. कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून जोरदार तोडफोड केली आहे.

स्टोरीया फूड्स या कंपनीने एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीमध्ये काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह चित्रिकरण करण्यात आले आहे. या जाहिरातीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

त्यानंतर आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस आणि युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली.

‘आमचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिरातीत आक्षेपार्ह दाखविण्यात आले, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि स्टोरीया फुडस कंपनीने जाहीररीत्या माफी मागावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल. स्टोरीया फुडसचे कार्यालय आम्ही बंद पाडू, असा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here