मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – देशात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवे उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशातच देशभरात अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग असल्याचे पाहायला मिळत आहे.
वैकुंठभूमीत एका चितेवर अनेकांचे अंत्यसंस्कार केले जात आहेत. अनेकांनी तर मिळेल तिथे अंत्यसंस्कार केल्याचे विदारक दृष्य देशाने पाहिले. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायलयाने दखल घेतली असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. आताच्या घडीला मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी नाही. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला उच्च न्यायालायने दिले आहेत.






