फेसबुकवर जाहिरात करून दुप्पट दरात मद्यविक्री करणाऱ्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – फेसबुकवर जाहिरात करून हडपसर भागात दुप्पट किमतीत मद्य विक्री करणाऱ्या एकाविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. त्याच्याकडून मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

राजीव अग्रवाल (रा. भोसरी) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याने फेसबुकवर जाहिरात केली होती. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता, संबंधित व्यक्तीने हडपसर गाडी तळ परिसरात मद्य घेण्यासाठी बोलविले. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. तो दुप्पट किमतीत मद्य विकत होता. त्याच्याकडून मद्याच्या २८ बाटल्या जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले.

विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, महेश लेंडे, राहुल खाडगीर, निनाद निकम, कुणाल भांगरे, तात्याबा शिंदे आणि सागर धुर्वे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here