18+ रजिस्ट्रेशन सुरु होताच काही मिनिटांतच कोसळला कोविन ॲप सर्व्हर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. यासाठीची नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन) ‘कोविन ऍप’वर बुधवारी दुपारी 4 पासून सुरू झाले. परंतु अवघ्या काही मिनिटांतच ‘कोविन ऍप’ सर्व्हर कोसळले.

‘आरोग्य सेतू ऍप’चेही सर्व्हर डाऊन झाले. यामुळे देशभरात नेटकऱयांनी सोशल मिडियावर स्क्रीनशॉट शेअर करीत संताप व्यक्त केला. लस घेण्यासाठी ‘कोविन ऍप’ किंवा ‘आरोग्य सेतू’वर नोंदणी बंधनकारक आहे. 28 एप्रिलपासून ही नोंदणी सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते.

अनेकांनी मंगळवारी मध्यरात्री बारानंतर रजिस्ट्रेशनचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी दुपारी चारनंतर हे रजिस्ट्रेशन सुरू होईल असे सांगण्यात आले. देशभरातील हजारो नागरिक विशेषतः तरुणांनी रजिस्ट्रेशनचा प्रयत्न सुरू केला; पण सर्व्हर डाऊन होते. यामुळे भ्रमनिरास झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here