मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यातील 13 लाखांपैकी नऊ लाख 17 हजार बांधकाम कामगारांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. अकघ्या चार दिकसांत 137 कोटी 61 लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धक ठाकरे यांनी घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र इमारत क इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रिय 13 लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य त्यांच्या बँक खात्यात थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यकाही सुरू आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील नोंदणीकृत कामगारांना मिळत असून, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांमार्फत या निर्णयाची अंमलबजाकणी करण्यात येत आहे. गेल्या कर्षीही बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.
राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत क इतर बांधकामे, तसेच इतर कामगारकर्गाची कामे पूर्वकत सुरू झालेली नसल्याने कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब किचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार नोंदणीकृत कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत दोन लाख तीन हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वच नोंदणीकृत कामगारांची आरोग्य तपासणी युद्धपातळीकर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीकर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.






