बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – खुलताबाद तालुक्यातील बोडखा येथे विना डिग्री विना परवानगी बोडखा येथे बोगस डॉक्टर (मुन्नाभाई) डॉक्टर ए. एस पटेल हे विनापरवानगी दवाखाना चालत असल्याची माहिती तालुका आरोग्य आधीकारी डॉक्टर किरण शिंदे यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी दवाखान्यात धाड टाकली व डॉक्टर पटेल यांना पाच हजार रुपये दंड आकारून दवाखान्याच्या व्यवसायाबाबत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली
बाजार सावंगीत ही बंगाली बाबू सह मुन्नाभाई यांनी बोगस दवाखाने मोठ्या थाटाने मांडली आहेत ही बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे आरोग्य प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे या बोगस डॉक्टर कडे कुठलाही परवाना अथवा डिग्री पूर्व अनुभव नसतानाही वैद्यकीय व्यवसाय सर्रासपणे जोमात सुरू आहे दवाखान्याचे या बोगस डॉक्टरांनी तर मोठी मोठी फलक लावून सुरू आहे
याबद्दल बोडखा येथील बोगस डॉक्टर कडे कोणताही परवाना नसताना कुठलाही पूर्व अनुभव नसताना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे गट विकास अधिकारी सुरडकर यांनी बोडखा येथील बोगस डॉक्टर पटेल याच्यावर धाड टाकत पटेल याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस देण्यात आली या कारवाईमुळे बंगाली बाबू सह मुन्नाभाई यांचे धाबे दणाणून गेले आहे






