पोलीस – होमगार्ड संघर्ष समिती मार्फत ठाण्यातील आजारी नागरिकांच्या मदतीला अबोली रिक्षाचालक – मालकांची फौज

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र पोलीस ,होमगार्ड संघर्ष समिती यांच्यामार्फत जंतुनाशक फवारणी( sanitizer) व कोरोना कालावधी मध्ये इतर आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे काम महाराष्ट्र अध्यक्ष- मा श्री सिद्धार्थ डी जाधव, निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा श्री धीरज पार्सेकर ,मुंबई अध्यक्ष मा श्री अमोल माने, यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून कोरोना चा संसर्ग थांबवण्यासाठी आजाराने त्रस्त रुग्णांना व ज्येष्ठ नागरिकांना योग्य मदत मिळावी यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखा व होमगार्ड संघर्ष समितीचे ठाणे अध्यक्ष श्री सतीश बनसोडे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या अबोली रिक्षांची फौज तैनात केली आहे आयपीएस पोलीस उपायुक्त मा श्री बाळासाहेब पाटील संचार बंदी कालखंडामध्ये रिक्षा द्वारे मोफत सेवा देण्याची माहिती दिली

संचारबंदी कालखंडामध्ये गरीब गरजू लोकांना आजारामध्ये कोणतीही कमतरता भासू नये म्हणून योग्य मदत मिळावी यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आयपीएस यांनी पोलिसांना आदेश दिले होते गरजू रुग्णांना वेळेत वाहन उपलब्ध होत नसल्याने अनेकदा उपचार घेण्यासाठी विलंब होत होता त्यामुळे वाहतूक शाखा यांना सदर बाब निदर्शनास आली त्या अनुषंगाने महिला अबोली चालक-मालक वाहन उपलब्ध करुन दिल्यास ती अडचण दूर होईल त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे होमगार्ड संघर्ष समिती अध्यक्ष सतीश बनसोडे व वाहतूक जिल्हा अध्यक्ष सौ प्रीती खानेकर यांनी अबोली रिक्षाचालकाशी संपर्क करून निर्बंधांना ची अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या सोयीसाठी अबोली रिक्षा चालक व मालक यांच्या मदतीने नागरिकांना अत्या आवश्यक सेवेसाठी मोफत गरीब गरजू रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या योजनेला प्रतिसाद दिला तसेच प्रत्येक नाकाबंदी तील पोलीस चौकी व पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय वाहतूक शाखा जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

sanitizer-favarni

पोलिसांना माक्स व सॅनिटायझर वाटप करण्यात आले त्यामध्ये 22 महिला रिक्षाचालकांनी सहभागी झाल्या कोरोणाचे संपूर्ण देशावर मोठे संकट उभे ठाकले आहे पहिल्या लाटेच्या वेळी संचार बंदी च्या काळात अनेक रुग्णांना वाहनेही मिळाली नाहीत त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून गरोदर महिला डायलिसिस साठी जाणारे रुग्ण आणि नियमित तपासणी ला जाणाऱ्या रुग्णांना रिक्षाच्या मागणीनुसार मोफत सेवा पुरवली जाणार असल्याचे सौ. सरोज पोटफोडे व सौ. उषा पवार अबोलीच्या चालक यांनी आपले मत व्यक्त केले त्यावेळी संघटनेचे महिला अत्याचार अध्यक्ष सौ. शोभना ओवाळ सदस्य पुष्पा शितोळे, कोमल आरोरा,गुड्डू खान, सुरज ओवाळ, मोहम्मद शेख व नासिक कंट्रोल चे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here