नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना गुरुवारी एम्समधून छुट्टी मिळाली. गेल्या 19 एप्रिलला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोना व्हायरस लशीचे दोन्हीही डोस घेतले आहेत.मनमोहन सिंग हे दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. तसेच ते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञही आहेत. ते रिझर्व बँकेचे गव्हर्नरही होती.
कोरोनाची लागण होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रही लिहिले होते. या पत्रामधून त्यांनी नरेंद्र मोदींना देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. कारण कोरोनाविरोधातील लढाईत ही बाब महत्त्वपूर्ण आहे. तसेच, आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे, याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचे लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे सिंग म्हटले होते. मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले होते.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेले सल्ले या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आले होते. पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.






