ईदची नमाज ईद गाह मध्ये अदा करू द्या; मुस्लिम समाजाचे शासनास साकडे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – १ जुलैपासून महाराष्ट्र राज्यात अन लॉक धोरण सुरू झाले असून पुष्कळ अटी या शिथिल करण्यात आल्या व पुढे १ ऑगस्ट पासून अजून शिथिलता देण्यात येणार असल्याचे सूतोवाच झाले परंतु जे सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे श्रद्धा व आस्था या मानवाच्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांना शासनाने अद्याप वंचित ठेवले आहे म्हणून आज शुक्रवार रोजी नमाजनंतर जळगाव शहरातील सुमारे २५ विविध मुस्लिम संघटनांनी एकत्रित येऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदन दिले असून येणाऱ्या बकरी इद पासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून सर्व समाजाचे, धर्माचे प्रार्थनास्थळ उघडावे अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे. बकरी ईद ची नमाज ही ईदगाह मैदानावर व मस्जिद मधेच पढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शासनास करण्यात आली.
सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी स्वीकारून आपल्या भावना अत्यंत रास्त असून त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचू असे आश्वासन दिले. सदर निवेदन शहर ए काझी मुफ्ती अतिकउर रहेमान यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी सोबत राष्ट्रवादी अल्पसंख्याक महाराष्ट्राचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक मानियार, बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारुक शेख,कुलजमातीचे अध्यक्ष सैयद चाँद, वहिदत ए इस्लामीचे डॉक्टर जावेद शेख,उलमा कौन्सिल चे मौलाना एजाज खान,ईद गाह ट्रस्ट चे अनिस शाह आदी उपस्थित होते.
निवेदनावर महाराष्ट्र शाह बिरदारीचे उपाध्यक्ष डॉ अमनुल्लाह शाह, जमात-ए-इस्लामी चे मुस्ताक मिर्झा, ताब्लिग जमातचे अख्तर पिंजारी, अहेलेवल सुन्नत जमात चे इक्बाल वजीर, महाराष्ट्र पीस अँड जस्टीस महमूद खान, वहिदत ए इस्लामी चे अतीक शेख, कुल जमाती कौन्सिलचे झाकीर शेख, इस्लामिक युथ फेडरेशनचे उमर शेख ,मलिक फाऊंडेशनचे नदीम मलिक, एस आय ओ चे प्राध्यापक सोहेल शेख, अक्सा बॉईज क्लब आमिर शेख, अल हिंद चॅरिटेबल ट्रस्ट अल्ताफ शेख, फर्स्ट एड फाऊंडेशनचे शकील हनांन,अल खैर ट्रस्ट युसुफ शाह, कादरिया फाऊंडेशनचे फारूक कादरी, डायमंड ऑफ ईकरा डॉक्टर रिजवान खाटीक, मरकज ग्रुपचे रईस शेख, सिकलिगर बिरादरीचे अन्वर खान व अझीझ खान, बागवान बिरादरीचे गुलाब बागवान, पिंजारी बिरादरीचे इकबाल पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here