स्कुल बसेसना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी द्यावी.

विद्यार्थी वाहतूक बस चालक मालक संघटनेची मागणी

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – स्कूल बस व्यावसायिक गेले १३ महिने १६ मार्च २०२० पासून शासकीय आदेशाने शाळा बंद ठेवण्यात आल्या मुळे घरीच बसुन आहेत. लाखो रूपये किंमतीच्या बसेस रस्त्यावर धुळ खात पडुन आहेत. बॅटरी , टायर , डिझेल चोरीला जाणे हे तर भोगतच आहे .परंतु वित्त कंपन्या , बॅंका , विमा कंपन्या यांच्या कडुन तगादे चालुच आहेत.

१४ एप्रिल २०२१ ला मा. मुख्यमंत्र्यांनी रोजंदारी कामगार जसे कि अधिकृत परवाना धारक फेरीवाले , रिक्षावाले , बांधकाम मजुर यांना मदत जाहीर केली. अधिकृत परवाना धारक स्कूल बस व्यावसायिक कर रुपाने दरवर्षी शासनाच्या महसुलात लाखो रूपयांची भर घालत असतांना कोणतीच आर्थिक मदत जाहीर केली नाही.

जुन २०२० पासून अडचणीं संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग , विविध खात्याचे मंत्री , विरोधी पक्षनेते यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला असून आजतागायत न्याय मागण्यांकडे सर्वांनीच कानाडोळा केला. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ डिसेंबर २०२० रोजी आझाद मैदानात एक दिवसीय धरणं आंदोलन सुध्दा करण्यात आले. परंतु ना कोणताही शासकिय अधिकारी ( परिवहन विभाग ) ना सत्तारूढ पक्ष ना विरोधी पक्ष कोणीच याची दखल सुध्दा घेतली नाही. त्यांच्या स्कुल बसेसना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यामुळे ते चटणी भाकरी तरी खातील. श्री. दिलीप पाठकजी,विद्यार्थी वाहतूक संघटणा ठाणे चे सरचिटणीस आहेत.त्यांनी ही माहिती सांगितल्याचे पत्रकार सुभाष शांताराम जैन यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here