जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र शासन हे सर्वांना मोफत लस देणार असून धरणगाव तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी लस घेवून कोरोनाचा नायनाट करावा असे आवाहन बालाजी वाहन व्यवस्थापक समिती अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र सिनेट सदस्य प्रा डी आर पाटील व पत्रकारांनी केले आहे.
लस घेण्यासंदर्भात नागरिकांना मध्ये अनेक संग्रम पसरवले गेले होते व गैरसमज सुध्दा झाला होता लस घेतल्यास शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात,अनेकांनी लस घेतल्यावर दुषपरिणाम झालेत,या सर्व अफवा असून भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साो,राष्ट्रपती,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साो,अनेक मंत्री,उघोगपति,पत्रकार यांनी सुध्दा लस घेतली आहे. आम्ही सुद्धा आज दुसरा डोस घेतला लस ही कोरोना पासून बचाव करण्यासाठी व आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढवते. पहिली लस घेतल्यानंतर किमान 6 ते 8 आठवड्यांनी दुसरी लस घ्यावी असे आवाहन प्रा.डी आर पाटील,ता.कांग्रेस अध्यक्ष रतिलाल चौधरी,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कडू महाजन,युवासेनेचे पत्रकार योगेश पी.पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
लस घेत असतांना व घेतल्यावर
ग्रामीण रुग्णालयाचे डॉ मोनाली देसाई,सौ किरण विसपुते नागरिकांनी कशी काळजी घ्यावी-
1)आधार कार्ड अपडेट करुन आणावे (1 किंवा 2 आधार कार्ड असेल तर सोबत आणावे ).
2) येताना दोन-तीन मोबाईल नंबर नोंदनी साठि सोबत आणावे
3) 18 वर्षावरील लोकांनी स्वतः रजिस्ट्रेशन करावे
4) CoWIN aap वरती रजिस्ट्रेशन करावे
5) लस घेतल्यानंतर त्या जागी चोळू नये, दाबून ठेवावे.
6) covishield लसीच्या दोन डोस मध्ये 45 ते 56 दिवसाचे अंतर असायला पाहिजे
7) लस घेण्यासाठी उपाशी पोटी येऊ नये.
8) लस दिल्यानंतर त्या ठिकाणी चोळु नये. दाबून ठेवावे.
9) लस घेण्याअगोदर सर्दी खोकला असेल तर 7 ते 8दिवसानंतर लस घ्यावी नाहीतर कोविड19 ची तपासणी करून घ्यावी.
10) लस घेतल्यानंतर थंडीताप ,अंगदुखी, डोकेदुखी ,सर्दी होऊ शकते असं होत असेल तर पॅरासिटामोल गोळी घेऊन घेणे .एक किंवा दोन दिवस ही लक्षणे राहू शकतात.
11) ज्यांना लस घेण्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी दीड महिन्यानंतर लस घ्यावी.
12) लस घेतल्यानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात बसून राहावे मग घरी जावे.
13) एका मोबाईल क्रमांकावर आपण चार जणांची नोंदणी करू शकतो .
14) आपल्याला काही औषधांची ॲलर्जी असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी.
15) जर आपणास काही औषधांची अँलर्जी असेल, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे.
16) कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इ.आजारांसाठी एखादी व्यक्ती औषधी घेत असल्यास तो / ती व्यक्ती उच्च जोखमीच्या प्रकारात मोडली जाते. त्यांना कोविड 19 लस घेणे आवश्यक आहे.
17) कोविड -19च्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याने अँटीबाँडीजचे संरक्षणात्मक स्तर सामान्यतः विकसित होतात.
18) कोविड लसीचे योग्य दोन डोस घेतल्या नंतर लाभार्थ्यांस त्यांच्या मोबाईल नंबर वर SMS ने माहिती मिळेल.त्यात क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र ही पाठविले जाईल.
अशी माहिती देत होते, पोलीस व होमगार्ड यांनी सोशल डीस्टंसिंगचे पालन करण्यासाठी सहकार्य करत होते.






