मुंबई (प्रतिनिधी) – कोरोना पार्श्वभूमीवर सध्याच्या कठीण काळात रक्तपेढी रिकामी आहे. कोरोना बाधित रूग्णांच्या साठी रक्तदान , प्लाझ्मा दान करण्याची खुप गरज भासते याची व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मुंबई रेल्वे च्या पोलीस उप आयुक्त सुजाता पाटील यांनी गरजूंना मदत करण्यासाठी रक्तदान केले.
विशेषतः सध्या त्यांचा रोजाचा उपवास आहे तरीही गरजूंना मदत व्हावी या भावनेने त्यांनी रक्तदान केले आहे.मुंबई रेल्वे पोलीस उप आयुक्त सुजाता पाटील यांचा आदर्श समोर ठेवून तरुणांनी रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्यासाठी जरूर पुढाकार घ्यावा. ग्रेट लेडी सींघम मॅडम मुंबई रेल्वे पोलीस उप आयुक्त सुजाता पाटील यांच्या कर्तुत्वाला बुलंद पोलीस टाइम्सचा मानाचा मुजरा!






