रशियाच्या स्पुटनिक V लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली – कोरोना संकट आणि त्यात लसीचा तुटवडा या संकटाच्या काळात देशासाठी चांगली बातमी आली आहे. रशियन लस स्पुटनिक V लसीची पहिली खेप शनिवारी हैदराबादला पोहोचली आहे. रशियावरुन खास विमानाने स्पुटनिकची ही लस हैदराबादला दाखल झाली आहे. कोरोना व्हायरसविरूद्ध ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. या लसीचे डोस उपलब्ध झाल्याने लसीकरणाला गती मिळणार आहे. लसीकरणाला गती देण्यासाठीच केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी स्पुटनिक V लसीला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

काही दिवसापूर्वी ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताच्या DCGI ची मंजुरी मिळाली होती. आणि स्पुतनिक V वापराला मान्यता देणारा भारत हा 62 वा देश ठरला. ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ या लसीच्या वितरणासाठी असलेल्या कंपनीने भारतात डॉक्टर रेड्डीज लॅब सोबत करार केला आहे. पहिल्या खेपेत दीड ते 2 लाख डोस सध्या भारतात आल्याची माहिती मिळतेय. मात्र मे महिन्याच्या शेवटपर्यंत 30 लाख डोस भारतात येण्याची शक्यता आहे.

रशियाची स्पुटनिक V ही जगातील पहिली लस आहे. 11 ऑगस्ट 2020 रोजी रशियाने या लसीची नोंदणी केली होती. ही लस गॅमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडोमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here