राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्हयांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.

आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्हयांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्हयांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठयानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकूण पाच केंद्रांवर २७६ जणांनी लस घेतली. यापैकी १८५ जण नाशिक शहरातील आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. १ मे अखेर जिल्ह्यात ६५ हजार ६८८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर २९ हजार ७२ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. म्हणजेच २९ हजार ७२ आरोग्यकर्मींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय ५७ हजार ९०९ फ्रंटलाईन वर्कर्सने पहिला डोस तर २१ हजार ९७६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here