बड्या व्यक्तींच्या धमक्यांनी आदर पुनावाला कोविशील्डचे उत्पादन देशाबाहेर करण्याच्या विचारात

नवी दिल्ली – सिरमच्या कोरोना लसीसाठी देशातील अनेक बडय़ा व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत येत आहेत. विविध घटकांकडून कोविशील्ड लसीसाठीचा दबाव वाढतोय. यामुळे सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला देशाबाहेर लस उत्पादन हलविण्याच्या विचार करत आहेत.

कोविशील्ड लसीसाठी आपल्याला देशातील काही बडय़ा व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश असल्याचं ‘द टाइम्स यूके’ला दिलेल्या मुलाखतीत पुनावाला यांनी म्हटलं आहे. अदर पुनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. तिथेच त्यांनी ही मुलाखत दिली आहे.

लसीचा पुरवठा व्हावा यासाठी असलेली अपेक्षा आणि त्यासाठीची आक्रमकता ही खरंच न समजण्यासारखी आहे. याला धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. लसीसाठी येणाऱ्या फोनकॉल्सची भाषा ही शिवराळ नसली तरी त्यांची आक्रमकता मला जाणवते आहे. जर माझ्याकडून लसीचा पुरवठा झाला नाही तर काय होईल याचीही झलक यातून दिसते, अशा शब्दांत पुनावाला यांनी लस पुरवठय़ासाठी येणाऱ्या दबावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here