परमबीर सिंग यांच्यानंतर आता पोलीस महासंचालकांनी टाकला लेटर बॉम्ब

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बरीच उलथापालथ झाली. आता पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही राज्य सरकारला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांच्या चौकशी करण्यास नकार दिला आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला एक पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी नुकतेच उच्च न्यायालयात संजय पांडे यांच्या विरोधात याचिका केली आहे. या याचिकेत अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी वसूली प्रकरणी आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे दबाव टाकत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यानंतर आता संजय पांडे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशी करण्यास नकार दिला आहे.

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर 5 मे रोजी सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच त्यांनी पत्र लिहून परमबीर सिंग यांची चौकशी करण्यात नकार दर्शवला आहे. विशेष म्हणजे, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी तक्रार केली होती. डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर अंडरवर्ल्डसोबत संबंध आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

2019 मध्ये डांगे यांनी एका पबवर धाड टाकली होती. तेव्हा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने पब मालकाने डांगे याने धमकी दिली होती. नंतर डांगे यांना खातेनिहाय चौकशी करुन निलंबित करण्यात आले होते. पुर्ननियुक्ती करण्यासाठी डांगेंकडून परमबीर सिंह यांच्या खास माणसांनी 2 कोटी रुपये मागणी केली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here