चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रात भीषण आग

चंद्रपूर – शहरालगतच्या दुर्गापूर परिसरातील महाऔष्णिक विद्युत केंद्रात काल रविवारी (२ मे) ला रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शार्ट सर्किटमुळे लागल्याची सुत्रांची माहिती आहे. वेळीच अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. सदर घटना वेळीच नियंत्रणात आल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याची घटना टळली आहे.

शहरालगच्या दुर्गापूर परिसरात ३३४० मेगावॉट क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र कार्यान्वित आहे. या केंद्रातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वीज पुरवठा केला जातो. चंद्रपुरातील औष्णिक विद्युत प्रकल्पात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. 7 व 8 क्रमांकाच्या बॉयलर जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती सुत्रांनी दिली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. विद्युत उत्पादनासाठी ठेवण्यात आलेला कोळसा व त्यामधील कन्व्हेअर बेल्ट आगीत जळाला आहे. लगेच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने घटनास्थळी येवून बराच वेळानंतर आग आटोक्यात आणली.

संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर चंद्रपूर येथील दुर्गापूर परिसरातील औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा केला जातो. काल रात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे आठ आणि नऊ संचाच्या कार्यप्रणालीला या आगीमुळे धोका निर्माण झाला असता.आगीची भीषणता वाढली असती तर तर बरेच संच क्षतिग्रस्त झाले असते. राज्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होऊन काळोख पसरला असता परंतु समयसूचकतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने राज्य काळोखात येण्याचा अनर्थ टाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here