रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती मृत्यू विमा साईबाबा संस्थानने काढावा – विठ्ठल पवार

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या आप्तकालीन परिस्थितीत संस्थानचे विविध विभागातील कर्मचारी हे दिवसरात्र स्वतःची जीव धोक्यात घालून रूग्णसेवा करीत असून अनेक लोकांचे प्राण वाचवित आहेत. काम करीत असतांना संस्थानचे विविध कार्यकारी विभागांतील कर्मचा-यांचा एकमेकांशी कामानिमित्त संपर्क येत असून, अनेक कर्मचारी यांना कोरोना रोगांची बाधा झालेली आहे, तसेच संपूर्ण कुटूंबही बाधीत झालेले असून आजपर्यंत १५ ते २० कर्मचारी यांनी आपला जीव (प्राण) कोरोना रोगामुळे गमावलेला आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी कर्मचा-यांचा नैसगिक आपत्ती मृत्यु विमा उतरविणे गरजेचे होते. अनेक कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. आजपावतो नैसगिक आपत्ती विमा उतरविला असता तर कोव्हीड मुळे आकस्मित मृत्यु पावलेल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला असता. परंतु नैसगिक आपत्ती मृत्यु विमा कवच नसल्याने, त्याच्या कुटुंबावर उपासमारीचे वेळ आलेली आहे. श्री साईबाबा संस्थानकडे अनेक वर्षापासून कामगार व लेखाशाखा विभाग कामगार कल्याण निधी पडुन आहे.

या निधीचा विनायोग कामगाराचा नैसगिक मृत्यु आपत्ती विम्यासाठी करण्यात यावा. तसेच कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी व मृत्यु पावलेल्या कुटुंबातील सदस्य यांना अनुकंपाच्या धर्तीवर तातडीने नोकरी दयावी. तसेच श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिडी व तदर्थ समिती सदस्य यांनी एक विशेष बाब म्हणून रुग्णालय विभागाच्या कर्मचा-यांप्रमाणे इतर विभागातील सर्व कर्मचा यांचे तातडीने लसीकरण करावे. कोरोनाची बाधा झालेल्या संस्थान कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना राखीव बेड, ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नाहीत. संस्थान कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्याकरीता राखीव बेड, ऑक्सीजन बेड राखीव ठेवण्यात यावेत.

आजपर्यंत अनेकांना प्रयत्न करूनही संस्थान रुग्णालयात उपचार घेता आलेले नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी बेड शिल्लक नसल्याने खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतलेले असून, स्वखर्चाने त्यांनी वैद्यकीय उपचाराची बीले आदा केलेली आहे. तसेच अनेक कर्मचारी हे वैद्यकीय उपचाराची बील परताव्याकरीता प्रतिक्षेत असून, वैद्यकीय उपचाराची बील परताव्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. संस्थानमधील सेवा देणा-या डॉक्टर, नर्से स, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, टेक्नीकल कर्मचारी, प्रसादालय विभागातील कर्मचारी, तसेच संस्थानचे विविध कार्यकारी विभागातील कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता आपली सेवा चोख बजावीत आहे. तरी उपरोक्त सर्व बाबींचा कामगारहितासाठी तातडीने विचार होऊन संस्थानमार्फत सर्व कर्मचा यांचे (कायम व कंत्राटी) मोफत लसीकरण, तसेच संस्थान रुग्णालयात कर्मचारी व त्यांचे कुटुंबासाठी खाटा आरक्षीत करणे व आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक विमा उतरविणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी मागणी विठ्ठल पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here