सभागृहनेत्या सौ विशाखा शरद राऊत तसेच नगरसेविका सौ प्रीती प्रकाश पाटणकर यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सभागृहनेत्या सौ विशाखा शरद राऊत तसेच नगरसेविका सौ प्रीती प्रकाश पाटणकर ह्यांच्या प्रयत्नाने कोहिनूर वाहनतळ येथे नवीन लसीकरण केंद्र आज (दि.४) सुरू होत आहे.
कोहिनुर लसीकरण केंद्रावर तीन रांगा लावण्याची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे यात 1) १८ वर्षावरील नोंदणी झालेली व्यक्ती 2) ४५ वर्षावरील पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तींची 3) दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींची असून, ७० वर्षा वरील जेष्ठ नागरिक, अपंग, व्याधीग्रस्त व्यक्तींकरिता व्हीलचेर तसेच वेगळ्या रांगेतून लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींकरिता जर त्यांच्याकडे गाडीची व्यवस्था असेल तर जे.के.सावंत मार्गावरून ड्राइव्हईन सुविधा उपलब्ध केली आहे, त्यामधे लसीकरण पार्किंगस्पेस मधेच आपल्या गाडीतच बसल्याबसल्या करून देतील, परंतु आपणास पार्किंगचे पैसे भरावे लागतील व ठराविक वेळेकरिता वाहनतळात थांबावे लागणार आहे. सदर ड्राइव्हइन सुविधा ही सध्यातरी जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींकरिताच आहे.






