अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – अलिबाग मध्ये रोज सरासरी 200 कोरोना रुग्ण मिळत आहेत व गावोगावी हळदी समारंभ ,लग्न इत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सरकारी निर्बंध झुगारून करत आहेत. त्यामुळे अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. आपण गावोगावी सर्वे केला असता सर्दी खोकल्याचे रुग्ण व ताप येण्याचे प्रमाण खूप प्रमाण वाढले आहे तरी आपण याचा गांभीर्य पूर्ण विचार करून प्रत्येक ग्रामपंचायत विभागात घराघरात जाऊन स्क्रीनिंग करून टेंपरेचर चेक करून आजारी असलेले रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य तो उपचार करण्यास स्थानिक विभागातील आरोग्य केंद्र यांना सूचना द्याव्यात, त्याचप्रमाणे सध्या अलिबाग मध्ये गावोगावी होम आयसॉलेट असलेले रुग्ण 14 दिवस होमकोरंनटाईन राहिला पाहिजे. परंतु सात ते आठ दिवसानंतर प्रसिद्ध होणाऱ्या लिस्टमध्ये बरे होण्याची त्यांची नाव आल्यास सदर रुग्ण बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत .

सदर बाबीचा आपण योग्य तो तपशील आपल्या तलाठी मार्फत घेऊन बाहेर फिरणाऱ्या होमआयसॉलेट रुग्णांवर कारवाई करावी. कारण त्यामुळे अलिबाग तालुक्यात रोजच्या रोज रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण वाढत आहे .आजच्या घडीला साधारण अलिबाग तालुक्यात तीन हजाराच्यावर ॲक्टिव रूग्ण आहेत.

अलिबाग नगरपालिका क्षेत्रात सकाळी सात ते अकराच्या दरम्यान खूप प्रमाणे गर्दी केली जाते .संपूर्ण नियमांचे उल्लंघन करून एसटी स्टँड, बँक इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्स चा फज्जा पोलिसांसमोर उडवला जात आहे, पोलिसांसमोर सुद्धा नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. कृपया आपण अलिबाग तालुक्यात होणारा रुग्ण वाढ कमी साठी कडक निर्बंध लावून होणारी रुग्ण वाढ कमी आणावी.






