रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना कोविंड लस देण्याबाबत विशेष मोहीम राबवावी; साईनाथ पवार यांची निवेदनाद्वारे मागणी

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – दिव्यांग हा एक समाजाचा घटक आहे आणि या प्रवाहाला मुख्य समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. रायगड जिल्ह्यामध्ये साधारणतः 5 ते ८ हजार दिव्यांग 45 वर्षावरील आहेत.

दिव्यांग व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती सामान्य व्यक्ती पेक्षा कमी आहे. सदर दिव्यांग व्यक्तींना शारीरिक क्षमतेमुळे हालचाल करणे कठीण आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींना कोव्हीड लस देण्यासाठी दिव्यांग संघटना/ संस्था यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबविण्यात यावी.व दिव्यांग हालचाली करता येत नसल्याने त्यांना शासकीय यंत्रणेने त्यांच्यापर्यंत लस देण्यात यावी.mla-mahendra-dalavi-letter

कोव्हिड टेस्ट. करण्यासाठीसुद्धा दिव्यांगांना लाईनीत उभे करू नये त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे असा दिनांक 3/5/2021रोजी शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाची रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने काटेकोरपणे पालन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी केली आहे. आमदार महेंद्र दळवी दिव्यांगांसाठी केलेल्या मागणीबाबत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील दिव्यांगाकडून साईनाथ पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here