माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्‍नी अनुराधा ढोबळे यांचे निधन

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे (वय ५८) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील एका रुग्णालयात आज (मंगळवार) पहाटे निधन झाले. सध्या त्यांचे वास्तव्य मंगळवेढा येथे होते.

त्यांनी हुलजती जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. ‘सावली’ वुमेन्स फाउंडेशन च्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here