मेक्सिको – येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. मेक्सिको सिटीमध्ये एका एलिवेटेड मेट्रो लाइन कोसळल्याने कमीत कमी 23 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा एलिवेटेड लाइनवरुन मेट्रो जात होती, तेव्हा हा अपघात झाला. मेट्रोचा पूल खाली रस्त्यावर कोसळला. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
स्थानिक मीडियाने प्रसारित सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ट्रेनची बोगी पुलाच्या खाली कोसळताना दिसत आहे. या अपघातात ट्रेनच्या काही भागाने नुकसान झाले आहे. मेक्सिको शहरातील मेअर क्लाऊडिया शिवबाऊन यांनी मीडियाला सांगितलं की, या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तब्बल 70 जणं जखमी झाल्याची शक्यता आहे.
#ATENCIÓN | Este es el momento en que el Metro de la Línea 12 cayó luego de que una trabe de la vía se derrumbara. 👉🏼 https://t.co/DWxdVAANpq pic.twitter.com/DPtJ8Uc2Bp
— El Heraldo de México (@heraldodemexico) May 4, 2021
या अपघातानंतर अनेक कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मात्र बचाव कार्य थांबविण्यात आलं आहे. जेव्हा संपूर्ण जग कोरोना महासाथीशी सामना करीत आहे, तेव्हा मेक्सिकोमध्ये हा प्रकार घडला. कोरोना महासाथीमुळे देशातील 2,17,000 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.






