काँग्रेस विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर आणि मास्क वाटप

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन तर्फे कर्मचारी कामगार व माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते काँग्रेस विधान परिषदेचे आमदार मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माथाडी कष्टकरी कामगार यांच्यासाठी १ हजार सॅनिटीझर आणि १ हजार मास्क वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नविन गोळे आणि महाराष्ट्र राज्य सचिव सचिन साळुंखे यांनी सोमवार, दिनांक ३ मे २०२१ रोजी मस्जिद बंदर (वेस्ट) महावीर चेंबर्स मांडवी येथे आयोजित केला होता.

mumbai-congress-mask-distribution

यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप जगताप, महाराष्ट्र राज्य संघटक मारुती निकम तसेच अशोक लोटले, सुरेख साळुंखे, राहुल मस्कर,आंबदासभाऊ गणेशकर, महेंद्र बागल, सचिन वेलकर, अबू बकर तांबे, तुषार कदम, अनिल कोळेकर, उमेश जाधव, सचिन मस्कर हे युनियन सदस्य यावेळी उपस्थित होते. कोरोना कोविड – १९ चे सर्व नियमांचे पालन करूनच हा कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here