शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – कोरोनाच्या संकटकाळी राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला असताना आरोग्य सेवकांची सुद्धा वानवा असल्याचे चित्र सध्या शिर्डी सह राज्यात आहे…डॉक्टर असो नर्स असो किंवा वार्डबॉय भरमसाठ पगारावर त्यांची भरती खाजगी सह सरकारी रुग्णालये करून घेत आहेत सगळीकडे रुग्णालय असो अथवा स्टाफ या महामारीकडे बऱ्याच जणांनी संधी म्हणून आणि बक्कळ अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहिल्याचे चित्र आपण सर्वांनी अनुभवलय…अश्यातच या संधीसाधू दुनियेत शिर्डीत एका मुलीने यासर्व लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे…
लक्ष्मीनगर येथे राहणारी एका गरीब कुटुंबातील मुलगी कु. पायल रामेश्वर घोडके हिने नर्सिंग मध्ये प्रवेश घेतला परंतु कोरोना मुळे कॉलेज बंद असल्याने तिला घरी थांबावे लागले कॉलेज च्या दुसऱ्या वर्षी शिक्षण थांबल्याने तिच्यातील शिकण्याची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती अश्यातच तिने शिवसेना नेते कमलाकर कोते यांच्याशी संपर्क केला आणि साईबाबा संस्थान च्या कोविड सेंटर मध्ये स्टाफची कमतरता असल्याचे तिला कळले होते त्या आधारे तिने कमलाकर कोते यांना विनंती केली की मला बाबांच्या कोविड सेंटर मध्ये काम करण्याची संधी मिळवून द्या मला विनामोबदला सेवा देण्याची इच्छा आहे…तिची ह्या लहान वयात असलेली साईबाबांच्या नगरीत सेवेची इच्छाशक्ती पाहता कमलाकर कोते यांनीही तातडीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांची भेट घेत त्यांना ही गोष्ट सांगितली त्यांना सुद्धा तिचे कौतुक वाटले प्रांत साहेबांनी वेळ न दडवता राहत्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार कुंदन हिरे यांच्याशी संपर्क साधत तिला कोविड सेंटर मध्ये रुजू करण्याची विनंती केली.

तहसीलदारांनी तातडीने निर्णय घेत तिची रुजू करून घेतल्याची ऑर्डर काढून तिला फोन करून शुभेच्छा देत ऑर्डर काढल्याचे सांगितले ….ते ऐकून त्या मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला तिला विश्वास बसत नव्हता की स्वतः कुंदन हिरे यांचा तिला कॉल आलाय…यावरून हे मात्र अधोरेखित झाले की जर एखाद्याची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा असली तर साईबाबा त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करतातच आणि प्रामाणिक दृष्टीकोन असणारे तसेच प्रामाणिक सेवेची इच्छा असणाऱ्यांची कदर करणारे अधिकारी व नेते आपल्या शिर्डी शहराला तसेच तालुक्याला लाभले हे आपल्या तालुक्याचे भाग्यच म्हणावे लागेल..आणि पायल घोडके सारख्या असंख्य मुले मुली असतील परंतु त्यांनी आता या कठीण काळात रुग्णसेवेसाठी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे आणि ह्या मुलीचा आदर्श बाकीच्यांनी घ्यावा हीच शिर्डीकरांची अपेक्षा आहे.






