कामधेनु सोसायटी माकणे, व सफाळे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा

सफाळे (प्रतिनिधी) – समाजाचे आपण एक घटक असून, आजच्या कोरोना पार्श्वभूमीवरील कठीण काळात ,कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी ” ब्रेक द चैन ” च्या अनुषंगाने लाॅकडाउनच्या कठीण परिस्थितीत अनेक हाताना काम करण्याची ईच्छा असून सुध्दा घरातच नाईलाजाने बसुन राहवे लागले आहे.

शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करताना, रोजचे हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुर वर्गाला, घरातील चूल कशी पेटणार यांची चिंता वाटत आहे. परंतु आजही समाजात अनेक दानशूर व्यक्ती असून, समाजाचे आपण एक घटक असून, ज्या समाजाने आपणास घडविले त्या समाजचे आपण एक देणेदार आहोत, या भावनेने गोरगरीबांना मदत करणारे अनेक हात आजही समाजात पुढे येत आहेत.कामधेनु सोसायटी मौजे. माकणे ता,जि पालघर त्यातलीच एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सदैव मदत करीत असते. अश्या वेळी सदैव जनतेच्या सेवेसाठी, अहोरात्र झटणारे पोलीस दल कसे मागे राहणार. कामधेनु सोसायटी माकणे व सफाळे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे तांदुळवाडी तालुका जिल्हा पालघर हद्दीतील ” आचार्य पाडा व डोंगर पाडा ” येथील एकूण ८० कुटूंबाला जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.

या प्रसंगी दिलीप सुरेश तरे सरपंच ग्रामपंचायत माकणे, रमेश चावरा सरपंच ग्रामपंचायत तांदुळवाडी, पंकज पाटील पोलीस उपनिरीक्षक सफाळे पोलीस ठाणे, कैलास शेळके पो. ना. सफाळे पोलीस ठाणे, जतिन कदम सफाळे, संतोष काकड, विश्वनाथ पाटील, रवि जाबर , ग्रामस्थ तांदुळवाडी, यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

कार्यक्रमाचे आयोजक व कार्यक्रम यशस्वी करणारे कामधेनु सोसायटीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यात कार्यरत राहणारे विशाल साखरे, नंदकुमार म्हात्रे, राजेंद्र पाटील माजी ग्रा,पं.सदस्य, गिरीश किर्ती, उदय बारोट, अविनाश गुरव, प्रतिक धाडवे अभिलाष काटे, प्रदीप कनोजिया, राज रांगणेकर, भावेश भोईर, किरण वैती, मनोज पाटील, यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य होते. तसेच सचिन पाटील व प्रदीप पाटिल यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here