आमदार रविंद्र वायकर यांच्या वतीने जोगेश्वरीत अन्नदान सुरू

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या धर्तीवर गरजू लोकांसाठी अन्नदान सेवा रविंद्र वायकर (आमदार-माजी राज्यमंत्री) यांच्या मार्फत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.

या मोफत जेवणाच्या पाकिटांच्या वितरणाचा शुभारंभ आमदार रविंद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्यामनगर तलावा जवळील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराच्या आवारात करण्यात आला.शासनाच्या नियमांचे पालन करीत ही सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.

याप्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक सौ रचना सावंत, नगरसेवक श्री प्रवीण शिंदे, अनंत नर, उपविभाग प्रमुख श्री बाळा साटम, भारतीय विद्यार्थी सेनेचे निमंत्रक श्री कालिदास कांदळगावकर शाखाप्रमुख बाळा तावडे, प्रदीप गांधी, मंदार मोरे, नंदकुमार ताम्हणकर, शाखा संघटक सौ रश्मी गोडांबे, शाखा समन्वयक उमेश कदम, योगीत पाटील, उदय हेगिष्टे उपशाखाप्रमुख संजय महाडिक, अनिल म्हसकर, भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here