मुंबई (प्रतिनिधी) – वि. प. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत दि. 02/04/2021 रोजी आरोपी नामे नरेश हरिराम चौधरी, नारायणसिंग पिरसिंग राजपुत व जितेंद्रसिंग कालुसिंग गडवी यांनी मिळून ओमकार टॉवर, 3 री खेतवाडी, गिरगांव, मुंबई. या ठिकाणी फिर्यादी महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन ₹. 72,88,620/- जबरी चोरी करून पुरावे नष्ट करून पळ काढला.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी विरोधात काहीच पुरावा प्राप्त होत नसल्याने तांत्रिकबाबींचा सखोल अभ्यास करून तांत्रिक मदतीच्या आधारे त्यांचा शोध घेऊन आरोपी नामे नरेश हरिराम चौधरी, नारायणसिंग पिरसिंग राजपुत, जितेंद्रसिंग कालुसिंग गडवी व त्यांचे सहकारी नानजी बिराराम देवासी, गोवराम विरमाराम देवासी यांना राज्य गुजरात व राजस्थान येथुन अटक करण्यात आली.

नमूद अटक आरोपी कडून निवेदन पंचनाम्याअंतर्गत अद्याप पावेतो जबरी चोरी केलेल्या मालमत्ते पैकी रोख रकम ₹. 64,03,340/- हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. खालील नमूद पोलीस पथकाने दिनांक. 02/04/2021 ते दिनांक. 25/04/2021 रोजी दरम्यान अथक प्रयत्न करून न थांबता काहीही पुरवा नसताना मूळ आरोपीतांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
तपास पथक खालील प्रमाणे. वपोनि. हेमंत बावधनकर, पोनि. अविनाश मांदळे, (तपासी अधिकारी), पोउनी. राजाराम पोळ., पोउनी. सिद्धेश जोष्टे., पोउनी. दिलीप तांबे. , पोउनी. अभिजित देशमुख., पोउनी. शिवाजी बोरसे. , पोहक्र. 29340/गायकवाड., पोहक्र. 32428/महांगडे., पोनाक्र. 00108/आंबेकर., पोनाक्र. 03505/सिंग., पोनाक्र. 03751/गिरकर., पोनाक्र. 03806/साळवे., पोनाक्र. 03125/परब., पोशिक्र. 071300/सरवदे., पोशिक्र. 092565/कुंभार., ) पोशिक्र. 110122/पाथरूट. त्यामुळे त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. श्री. विश्वास नांगरे पाटील, पोलीस सह आयुक्त, (का. व सु) मुंबई यांनी त्यांच्या कार्यालयात विशेष पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.






