जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – काल दि.5 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवत मराठा समाजाचा पाठीत खंजीर खुपसले आहे. कालचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस ठरला आहे यानिमित्ताने मराठा समाजात असंतोष उद्रेक निर्माण झालेला आहे. याबाबत धरणगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माननीय नायब तहसीलदार वाडिले यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा लवकरात लवकर या निर्णयाचा फेरविचार व्हावा किंवा केंद्र सरकार पुन्हा माननीय राष्ट्रपती महोदय व राज्य सरकार यांनी मराठा आरक्षणाचा कायदा करावा. जर असे न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आणि सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. आज मराठा समाजाची दयनीय अशी परिस्थिती झालेली आहे याला सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहे. तरी आम्ही धरणगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माननीय नायब तहसीलदार वाडिले यांना निवेदन सादर करून आमच्या समाजाच्या भावना सरकारला कळवाव्यात व लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी.असे नाही झाल्यास आम्ही लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी चंदन पाटील,भिमराज पाटील, गुलाब मराठे,गोपाल पाटील, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील,मंगेश पाटील,वाल्मीक पाटील,राहुल मराठे,पत्रकार योगेश पी.पाटील,मोहन पाटील सर, विजय पाटील,विनीत सूर्यवंशी,भवरखेडे येथील शामकांत पाटील आणि अनोरे येथील मराठा प्रतिष्ठान चे महेश पाटील,कल्पेश पाटील, हर्षल पाटील,नितीन पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.






