जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा काँग्रेस

जळगाव (प्रतिनिधी शेख जावीद) | जळगाव जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा आज स्थानिक काँग्रेस भवन येथे अत्यंत उत्साहात आणि राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. संदीप भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी ॲड. संदीप भैय्या यांच्या हस्ते ॲड. अविनाश भालेराव यांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंह पाटील, ज्येष्ठ नेते व माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस विनोद कोळपकर आणि प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारुण नदवी उपस्थित होते.
तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रवीण सुरवाडे, माजी जिल्हाध्यक्ष राजीव दादा पाटील, सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे, अमळनेर अध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष मनोज चौधरी, पारोळा तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठान, एरंडोल तालुकाध्यक्ष सुनील पाटील, विजय महाजन, सुभाष पवार, एस.सी. विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. कैलास शेळके, भुसावळचे नगरसेवक अहमद कुरेशी आणि जळगाव ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यादरम्यान अमळनेर शेतकरी संघात नवनिर्वाचित झालेले संचालक सुरेश दादा पाटील, प्रा. श्याम पवार आणि धनगर आण्णा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात काँग्रेस संघटना मजबूत करण्यावर भर देत डॉ. ए. जी. भंगाळे, राजीव पाटील, विनोद कोळपकर, मुफ्ती हारुण नदवी, प्रवीण सुरवाडे, योगेंद्रसिंह पाटील आणि शामकांत तायडे यांची समयोचित भाषणे झाली. वक्त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

“NSUI पासून महिला काँग्रेसपर्यंत पक्ष संघटना मजबूत करणार!”
“जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’ (NSUI) पासून ते महिला काँग्रेसपर्यंत प्रत्येक फळीला बळकट करून जिल्ह्यात पक्षाला नवी उभारी दिली जाईल.”
— ॲड. अविनाश भालेराव (नूतन जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाबा देशमुख यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी जगदीश गाडे यांनी सर्वांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी सभापती इस्माईल भाई फकीरा, राहुल बाहेती, श्रीधर चौधरी, नदीम काझी, अंकुश कटारे, नितीन सूर्यवंशी, विजय वाणी, विजय कोसोदे, दीपक सोनवणे, प्रदीप सोनवणे, जाकीर बागवान, राहुल भालेराव, विशाल पवार, पाचोरा युवक काँग्रेसचे शकील इब्राहिम, वाडीलाल राठोड, राहुल मोरे, अल्ताफ खान, गिरीश पाटील तसेच अमळनेर महिला आघाडीच्या छायाताई कोरडे, मीराताई सोनवणे, अर्चनाताई गाढे, मीनाक्षीताई जावळे, लीलाताई सोनवणे, अरुणाताई पाटील आणि प्रतिभाताई सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला जळगाव जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here