कोरोना काळात जॅकलीनचे ‘रोटी बँक’द्वारे अन्नदान

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस गोरगरिबांसाठी पुढे सरसावली आहे. अडचणीच्या काळात गोरगरिब लोक उपाशी राहू नयेत, यासाठी तिने एका फौडेंशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला केली सुरुवात आहे. तिने स्वत: रस्त्यावर उतरून अन्नदान केले.

जॅकलीन फर्नांडीसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फौंडेशनची सुरुवात केली आहे. स्थापन करण्यात आलेले फौंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. जॅकलीनने याअंतर्गत एका एनजीओसोबत मिळून कोरोना काळात जवळपास १ लाख गरजूंना अन्न देण्याची जबाबदारी घेतली आहे. तिने रोटी बँक या सेवाभावी संस्थेसोबत मिळून मदत केली आहे.

actress-jackline-fernandez

रोटी बँक टीमसोबत जॅकलीन त्या ठिकाणी जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली. या माध्यमातून गरजूंना अन्न वाटपदेखील केले. तिचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्य़े ती स्टॉल लावून गरजूंना अन्नवाटप करताना दिसत आहे.

जॅकलीनच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. दरम्यान, जॅकलिन सलमान खानसोबत आगामी चित्रपट राधे-युअर मोस्ट वॉन्टे़ड भाईमध्ये झळकणार आहे. या चित्रपटातील तिचे गाणे दिल दे दिया रिलीज झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्यात तिच्या युनिक डान्स स्टेप्सदेखील दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here