मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – अभिनेत्री नोरा फतेही एक उत्तम डान्सर आहे. ती आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह आहे आणि आपल्या प्रत्येक फॅन्ससोबत ती आपली माहिती शेअर करत असते. नोरा सध्या शो डान्स दिवानेमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. तिच्या एका डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा एका महिला स्पर्धकाबरोबर लावणी डान्स करताना दिसत आहे.
तिचा हा व्हिडिओ टीव्ही कलर्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा आपल्या डान्सचा जलवा दाखवताना दिसते. व्हिडिओमध्ये स्टेजवर एक स्पर्धक लावणी करताना दिसत आहे. स्पर्धकाला पाहून नोरा खूप उत्साहित होताना दिसत आहे. मग, नोरा स्टेजवर जाऊन लोकप्रिय गाणे हाय गर्मीवर लावणी करताना दिसते.
व्हिडिओ शेअर करताना टीमने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “नोराला लावणी करताना पाहायचे आहे? तर पाहा सूचना आणि नोराचा स्टेजवर आग लावणारा परफॉर्मन्स केवळ डान्स दिवाने ३ वर.” अभिनेत्रीचा हा व्हिडिओ फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.
याआधी नोराने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फनी व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती एका गाण्यावर फनी एक्सप्रेशन्स देताना दिसत होती. व्हिडिओमध्ये नोरासोबत मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलिस्ट Marce Pedrozo देखील दिसत आहेत.
नोरा फतेही लवकरच अजय देवगनचा चित्रपट ‘भुजः द प्राईड इंडिया’ मध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, ऐमी विर्क आणि इहाना ढिल्लो मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुशियाने केले आहे.






