दाक्षिणात्य अभिनेते पांडू यांचे कोरोनाने निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – तमिळ चित्रपटांचे प्रसिध्द विनोदी अभिनेते पांडू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्यांच्या जाण्याने तमिळ चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर चाहते #RIPPandu हॅशटॅगसह त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अभिनेते पांडू ७४ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला होता. पांडू यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. शेवटी त्यांचे रुग्णालयात निधन झाले. पांडू यांच्या निधनाचे वृत्त अभिनेते, दिगेदर्शक आणि निर्माते मनोबाला यांनी ट्विटरवर शेअर केली होती. त्यांनी फोटो शेअर करत कॅप्‍शनमध्ये लिहिलं, ‘रेस्‍ट इन पीस पांडु… आज सकाळी कोव्हिडमुळे त्यांचा मृत्यू झाला.’

पांडू यांनी सुपरस्‍टार अजित कुमार यांचा चित्रपट ‘कढल कोटाई’मध्ये कॅमियो रोल केला होता. या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. दाक्षिणात्य चित्रपटांतील दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी अभिनय केला होता. विजय स्टारर चित्रपट ‘घिल्ली’मध्ये पांडू यांनी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here