कोरोना लसीकरण मोहीमेत नशाबंदी मंडळाच्या अनोखा उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – सध्या कोरोना कोविड – १९ या महामारीने संपूर्ण जग हदरले आहे. तंबाखू आणि धूम्रपान सेवनाने कोरोना होण्याचा धोका देखील जास्त असण्याचे सिद्ध झालेले आहे. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुंबई उपनगर जिल्हा संघटक सौ. दिशा कंळबे यांनी हरिलाल भगवती महानगर पालिका रुग्णालय बोरीवली येथे लसीकरण करून आलेल्या पुरूष आणि महिलांना व्यसनमुक्ती पत्रक वाटले व व्यसनमुक्ती बद्दलचे मार्गदर्शन केले. अशा प्रकारे त्यांनी नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश व जनजागृती केली.

महाराष्ट्र राज्यातल्या प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनात गेल्या वर्षात ३१.४ टक्क्यांपर्यत घट नोंदवण्यात आली असली तरी हा आकडा देखील फार मोठा आहे.

भारत देशात तर तंबाखू सेवनांचे प्रमाण हे जवळपास २६ टक्के एवढे आहे. दरदिवशी भारत देशात ३ हजार ५०० लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मरण पावत आहेत. तर ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here