शालेय कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत विशेष जनजागृती

शहादा (क्राइम रिपोर्टर सुशील गव्हाणे) – तालुक्यातील बामखेडा येथे पी. एम .सी.माध्य व आय. एच. पटेल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत विशेष जनजागृती करण्यात आली.

कोरोना नामक महामारीला समूळ नष्ट करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्यासंबंधी विविध शासकीय यंत्रणा सध्या लसीकरणावर विशेष भर देताना दिसून येत आहेत.परंतु ग्रामीण भागातील जनेत मध्ये मात्र लसीकरणसंबंधी विविध शँका व भीती आढळून येत आहेत . गावातील अधिकाधिक व्यक्तीनी लसीकरण करावे ह्या साठी बामखेडा येथील पी एम सी माध्य व आय एच पटेल उच्च माध्य. विद्यालयाचे सर्व कर्मचारी घरोघरी जाऊन जनजागृती करताना दिसून आलेत.

shahada-school-rally

आदिवासी नृत्याच्या साहाय्याने आदिवासी बांधवांना त्याच्या घरोघरी जाऊन कोरोना संबंधी विविध शंकांचे निराकरण करन्यात आले.लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत हे विविध उदाहरणांचा सहाय्याने समजावून देण्यात आले .विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आर.एस.चौधरी ह्यांनी स्थानिक लोकांना त्यांच्याच भाषेत मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यालयातील सर्व महिला कर्मचारी वर्गाने वयोवृद्ध महिलांना विशेष माहिती देऊन जनजागृती केली.

pmc-school-shahada

सदर जनजागृती नियोजन विद्यालयाचे प्राचार्य एस. एस .चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सदर रॅलीमध्ये बामखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज चौधरी,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.बामखेडा शाळेतील शिक्षकांच्या ह्या नाविन्यपूर्ण योगदानाचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक केले जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here