श्री साईबाबा संस्थानचे लसीकरण केंद्र मोफत करा – राहाता तालुका शिवसेनेची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज शिवसेना राहाता तालुक्याचे वतीने आज श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कान्हुराज बगाटे साहेब यांची भेट घेऊन विविध मागण्यां करण्यात आला यामध्ये श्री साईबाबा संस्थानचे लसीकरण केद्र मोफत करण्यात यांवे, हाँस्पीटल कडे वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन वैद्यकीय सेवा, सुविधा देण्यात याव्या, कोवीड सेटर येथे मेडिकल स्टोअर सुरू करण्यात यावे ,मंदिर हेल्पलाईन साठी महिला कर्मचारी याची नियुक्ती करण्यात यावी, साईभक्त घरपोच उदीप्रसाद पाठविण्यात यावा व ईतर मागण्या करण्यात आल्या.

या सर्व मागण्यांना तत्काळ प्रतिसाद देत मा.अ.नगर जिल्हाधिकारी. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी संपर्क करून लसीकरण मोफत करण्यात यांवे असा प्रस्ताव लगेचच सादर केला कोवीड सेटर येथे मेडिकल स्टोअर सुरु तातडीनी करण्याच्या आदेश दिला.

कर्मचाऱ्यांचे कोरोना विमा करण्याचे आदेश करण्यात आले, हेल्पलाईन साठी महिला कर्मचारी व उदीप्रसाद या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले. याप्रसंगी कान्हुराज बगाटे यांनी आय.ए.एस ट्रेनिग पुर्ण करुन आल्याबद्दल शिवसेनेचे वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपकार्यकारी रविंद्र ठाकरे, बाबासाहेब घोरपडे, डॉ. प्रितम वडगांवे, डॉ मैथीली पिताबरे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, जयराम कांदळकर,नवनाथ विश्वासराव,सतोष जाधव, चद्रकात गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here