विजय पाटील शिरसमणी यांचे दातृत्व
मुंबई (संपादक सुनिल पाटील) – शेळावे ता पारोळा मौजे धाबे ता पारोळा या आदिवासी वस्तीत बालकांच्या पोषणासाठी गावातील शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे हे नेहमी विविध सकस आहार वाटप उपक्रम बालकांसाठी नियमित घेत असुन केंद्र सरकारच्या ” आहार क्रांती ” अभियानाला प्रतिसाद देत उन्हाळी फळे वाटप सप्ताह घेवुन सरासरी रोज ५९ बालकांना पोटभर फळे खाऊ घातली व फळ आहाराचे महत्व समजाविले .
शिरसमणी ता पारोळा ग्राम पंचायत सदस्य विजय भा पाटील , सिव्हिल कॉन्ट्रक्टर , कल्याण यांनी आपल्या वाढदिवसाचा इतर खर्च न करता या गरजु बालकांना एक सप्ताह तरी या उन्हाळ्यात मिळणारे व उपयोगी फळे देण्याचे प्रायोजकत्व स्विकारून आपले दातृत्व दाखविले .त्यातुन बालकांना आंबे , खरबुज , कलिंगड , चिकु , पपई व द्राक्ष देण्यात आले .
काय व कशासाठी आहे केंद्र सरकारचे ” आहार क्रांती ” अभियान –
पोषणविषयक जनजागृती आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्न , फळे आणि भाजीपाला या सर्वांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी समर्पित ” आहार क्रांती ” या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नुकताच केला .विज्ञान भारती , जीआयएसटी , विज्ञान प्रसार आणि अनिवासी भारतीय शैक्षणिक व वैज्ञानिक संपर्क यांनी संयुक्तरीत्या ” आहार क्रांती ” अभियान सुरू केले आहे . ” उत्तम आहार – उत्तम विचार ” हे याचे बोधवाक्य आहे . भारत आणि जगात इतरत्र भेडसावणारी उपासमारीची समस्या आणि त्या सोबत येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणुन ” आहार क्रांती ” चळवळ सुरु करण्यात आली आहे .
एका अभ्यासानुसार भारतात जितक्या कॅलरीजचे ग्रहण केले जाते , त्यापेक्षा दुप्पट उत्पादन होते . तरीही देशातील बरेच लोक अद्यापी कुपोषित आहेत . या विसंगतीचे मूळ कारण पोषणाबाबत जागरूकतेचा अभाव हे आहे .पारंपारिक आहार समृध्द आणि पोषणमूल्यांनी परिपुर्ण असून त्याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून समस्येवर मात करणे हे अभियानाचे उदिष्ट आहे . हे स्थानिक पातळीवरील मोसमी फळे आणि भाज्यांमधील पौष्टिक संतुलित आहाराबाबत दृष्टिकोनात नव्याने बदल हे अभियान घडवेल .
देश आज कोरोना सारख्या साथीच्या आजाराच्या संकटाचा सामना करत असताना आजाराचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने संतुलित आहार हे एक महत्वाचे साधन आहे .






