जळगाव जिल्हा वकील संघातर्फे शासकीय लसीकरणाचा अभिनव उपक्रम

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था आणि जळगाव जिल्हा वकील संघ यांचे सहकार्याने जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात लसीकरणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ०६.०५.२०२१ ते दिनांक ०८.०५.२०२१ या कालावधीत महाराष्ट शासनाचे माध्यमातुन, मा. जिल्हाधिकारी जळगावं, मा. सिव्हील सर्जन जळगावं यांचे मार्गदर्शन व सहकार्याने जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था व जळगाव जिल्हा वकील संघ यांचे प्रयत्नाने जळगावं न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबीराचे उदघाटन, मा. प्र. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एस.डी. जगमलानी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप बोरसे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री ठोंबरे साहेब व जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री श्याम शिंदे, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री पी.यु.महाले व कौटुंबीक न्यायालय जळगावं चे प्रबंधक श्री. प्रमोद नगरकर, जिल्हा न्यायालय अधिक्षक श्री व्ही.एस.काळकर यांचे उपस्थितीत पार पडला. या उपक्रमात जवळपास ६०० ते ६५० न्यायालयीन कर्मचारी आणि वकीलांना व त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरणाचा लाभ मिळाला. हे लसीकरण शासकीय नियमांचे व सोशल डिस्टंसिंगचे पालन करून यशस्वीरित्या संपन्न झाले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा वकील संघ व जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था, जिल्हा न्यायालयीन लघुलेखक संघटना, गट क न्यायालीन कर्मचारी संघटना, जिल्हा न्यायालय बेलिफ संघटना, न्यायालयीन चतुर्थ कर्मचारी संघटना यांनी व त्यांचे सर्व पदाधिकारी प्रकाश सपकाळ, निलेश सुर्यवंशी, प्रशांत महाजन, कल्पेश पाटील, भुषण ब-हाटे, मनोज साळुखे, सौ. मंजुश्री त्रिवेदी, आर.डी.जोशी, प्रकाश सुर्यवंशी, सुचित पारीख, मनिष जैन, सुजित चंदनकर, मंगेश कुळकर्णी, ललीत चौधरी, अनिल बारी, अनिल शिंदे, कैलास पाटील, सागर कोळी, मयुर चव्हाण, परेश येवले, सचिन महाजन, अनिल खैरनार व इतर न्यायालयीन कर्मचारी तसेच, वकील संघाचे सचिव अॅड. दर्शन देशमुख, उपाध्यक्ष अॅड. प्रभाकर पाटील व जिल्हा वकील संघ कार्यकारणी सदस्य यांनी अथक परीश्रम घेउन उपक्रम यशस्विरीत्या पार पाडला.

कोविड-१९ या जागतीक महामारीमध्ये लसिकरणाला खुप मोठ्या प्रमाणावर महत्व आहे. लसिकरणामुळे मृत्युचे प्रमाण कमी झाले आहे, लोकांमध्ये लसिकरणाबाबत जागृती निर्माण व्हावी या हेतूने न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी म. जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे पाठपुरावा करुन स्वतंत्र परवानगी मिळवली आणि अशा प्रकारचा उपक्रम हा संपुर्ण महाराष्टात न्यायिक क्षेत्रात सर्व प्रथम जळगांव जिल्हयात झाला. त्यामुळे, या उपकमाला अभिनव उपकम म्हणून त्याचे संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here