अंधेरी पूर्व येथे आमदार रमेश लटके यांच्या हस्ते कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – माजी आमदार रमेश लटके यांच्या प्रयत्त्नाने व बृहन्मुंबई महानगर पालिका के/पूर्व विभागाच्या वतीने कोविड-19 लसीकरण केंद्र , इको हाइट्स संभाजी नगर आरोग्य केंद्र, सहार रोड, गोखले ब्रीज जवळ,अंधेरी (पूर्व) येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

andheri-vaccination

यावेळी सहाय्यक आयुक्त के/पूर्व विभाग कार्यालय मा. श्री. प्रशांत सपकाळे, प्रभाग समिती अध्यक्षा सौ. प्रियंका सावंत , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय बेळगे, शिवसेना संघटक श्री कमलेश राय, विधानसभा संघटक श्री. प्रमोद सावंत, वैद्यकीय अधिकारी सौ.उर्मिला पाटील , महिला विभाग संघटिका श्रीमती मंदाकिनी कदम , नगरसेवक श्री.संदीप नाईक उपविभाग प्रमुख श्री.अनिल खांडेकर , श्री.अशोक मिश्रा , महिला उपविभाग संघटिका श्रीमती.सुनीता ईलावडेकर , शाखा प्रमुख श्री.प्रकाश कोलापटे, श्री.बिपिन शिंदे, श्री.शेखर भाटकर, श्री.नरेश सावंत,महिला शाखा संघटिका सौ. आकांशा शिंदे, श्रीमती.वैशाली दळवी, सौ.स्मिता गुरव, श्रीमती सरीता रेवाळे, सौ.संजीवनी दणदणे , महानगरपालिकेचे संबंधित सर्व अधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, उपशाखाप्रमुख,गटप्रमुख, शिवसैनिक व या विभागातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here