शिर्डी शहरासह राहाता तालुक्यात जास्तीत जास्त ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी आज kovid 19 च्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्याचा दौरा केला. यामध्ये प्रामुख्याने कोरोणाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून शासकीय अधिकारी व श्री साईबाबा संस्थांनच्या अधिकाऱयांना विविध उपाय योजना करण्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

यावेळी साकुरी,शिर्डीसह शिर्डी विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे.शिर्डी शहराची लोकसंख्या जवळजवळ चाळीस हजाराच्या आसपास असल्याने शासनाने श्री साईबाबा संस्थानलाच मोफत लसीकरणाची परवानगी द्यावी. आणि शिर्डीकरांची लसीकरणाबाबत होणारी गैरसोय दूर करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नामदार थोरात साहेबांनी शिर्डीकरांची आणि मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय होऊ देणार नसून लसीकरण सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं.

याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे,आ.डॉ.सुधीर तांबे,डॉ.एकनाथ गोंदकर,ता.अध्यक्ष रावसाहेब बोठे,लताताई डांगे,विक्रांत दंडवते,राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा,उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन कोते,उप-कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे,उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार कुंदनकुमार हिरे,तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद म्हस्के, डॉ गोकुळ घोगरे,शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी डोईफोडे साहेब,श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रीतम वडगावे, श्री साईनाथ हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.मैथिली पितांबरे,राहात्याचे मुख्याधिकारी,मदन मोकाटे, मंगेश खाकाळे, गणेश मोगल,आदिंसह सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here