बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) – खुलताबाद तहसील कार्यालयातील जनरेटर 20 ते 22 वर्षों पासून पडलेल्या अवस्थेत आहेत/12/ 15 लाख इतक्या किमतीचा हा जनरेटर कित्येक वर्षाणूपासून वर्षापासून बंद पडलेल्या अवस्थेत आहे याकडे मात्र आतापर्यंत महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे
खुलताबादला दोन-दोन दिवस लाईट नसतात, खुलताबाद शहरातील व परिसरातील नागरिकांना पायपीट करण्याची वेळ आली आहे केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया म्हणजेच विविध प्रकारचे ऑनलाईन मिळणारे प्रमाणपत्र सातबारा व इतर कागदपत्रे वेळेअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय नुकसान होत आहे.
हा जनरेटर मागील कित्येक वर्षांपासून धूळ खात असल्यामुळे नागरिकांची या जनरेटर अभावी वेळोवेळी काम होत नाही व नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे व पायपीट करण्याची वेळ आली असून लाईट येण्याची तासनतास वाट पाहावी लागत आहे महसूल प्रशासनाने हे जनरेटर लवकरात लवकर चालू करावे या मुळे तहसील कार्यालयातील होणारे ऑनलाईन कामे विस्कळीत राहणार नाही व ग्रामीण भागातील नागरिकांना ही हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही अशी मागणी खुलताबाद शहरासह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.






