सुरक्षादलांनी जम्मू काश्‍मिरातील दहशतवादी अड्डा केला उद्‌ध्वस्त

जम्मू – जम्मू काश्‍मीरच्या पुंछ जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्‌ध्वस्त करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. तेथे 19 हातबॉंम्ब सापडले. सीमावर्ती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातबॉम्बचे स्फोट घडवून तेथील शांतता उद्धवस्त करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. तोही यानिमीत्ताने उधळून लावण्यात यश आले आहे.

सुरणकोटेच्या फगला भागात हा अड्डा होता. त्यावर लष्कर आणि पोलिसांनी आज संयुक्‍त कारवाई केली. एका नैसर्गिक गुहेत हा अड्डा होतो व तेथेच हे हातबॉम्ब लपवून ठेवण्यात आले होंते. काल शनिवारीच सुरक्षा दलांनी त्या राज्यात उच्च दर्जाची 40 किलो स्फोटकेही जप्त केली होती.

पाईप आयईडी बॉम्ब बनवण्यासाठी दहशतवाद्यांकडून त्याचा वापर केला जाणार होता. पोलीस व लष्कराच्या संयुक्‍त विद्यमाने सध्या सुनियोजितपणे दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू असून त्यांना गुप्तचर विभागाचीही मोठी साथ लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here