शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज साई द्वारकामाई प्रतिष्ठाणच्यावतीने व साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन विजूभाऊ कोते पा. यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील साईबाबा कोविड सेंटरमधील रूग्णांना उकडलेली अंडी देण्यात आली.
आजचे पाहूणे अंजनापूर येथील सोमनाथ खतोडे यांच्या पोल्ट्रीफार्म मधून 700 फ्रेश अंडी घेवून ती साई निर्माण अकॅडमी किचनमध्ये उकडून व्यवस्थित पॅक करून रूग्णलयाचे श्री वडगावे यांना फोन करून नुकत्याच वैद्यकिय अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सौ. डॅा. समृध्दी अभिजित कोते यांच्याकडे देण्यात आली त्या वेळेस त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. या कोविडच्या काळात साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीने दर गुरूवारी तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे जेणेकरुन काही भिक्षेकरी तसेच रुग्णालयातील बाहेरून आलेल्या रूग्णांचे नातेवाईक यांना थोडीशी मदत होईल.

यावेळी साई द्वारकामाई प्रतिष्ठाणचे सर्वश्री ताराचंद कोते, मोरे, सचिन गोंदकर, बबलू कोते, जितेंद्र रावते, अमोल सोमवंशी, नितीन गायकवाड, स्वप्निल सोमवंशी, महेश नागरे, विजय वाणी, शुभम कोते, मयुर कोते , आकाश कोते, साई संजय कोते,प्रतिक कोते उपस्थित होते.






