रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश सचिवपदी सचिन हांडे यांची नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश सचिव पदी विक्रोळीतील रिपाइं चे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन हांडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.

रिपाइंचे नवनियुक्त मुंबई प्रदेश सचिव सचिन हांडे यांना रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र प्रदान केले.यावेळी रिपाइं चे भगवान सावंत यांनी सचीन हांडे यांचे अभिनंदन केले आहे.

सचिन हांडे हे गेली अनेक वर्षे विक्रोळी टागोर नगर; कांजूरमार्ग या भागात त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून भरीव समाजकार्य केले आहे.रिपाइं च्या मुंबई प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सचिन हांडे यांचे घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग भांडुप या भागातील रिपाइं कार्यकर्त्यांनी विविध समाजसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here